हिवरखेड (जि.अकोला) : तब्बल सव्वाशे कोटीचा निधी मंजूर असल्यानंतरही अनेक वर्षांपासून काम सुरू असलेला हिवरखेड तेल्हारा अडसूळ राज्यमार्ग हा मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र आहे.<br />काही दिवसांपूर्वीच या दुर्गती झालेल्या रस्त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन बेलखेड येथील शेतकरी गजानन देवीदास जाधव मृत्युमुखी पडले होते. ते बँकेच्या कामानिमित्त तेल्हारा गेले होते. तेथून परतताना या रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर अकोला येथील इस्पितळात त्यांनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिली अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.<br />#hivarkhed #telhara #road #roadconstruction #akola #SakalNews #MarathiNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news #viral